विद्या विनयेन शोभते ! STUDENT POWER NATION POWER

Friday, March 27, 2015

मारहाणीच्या निषेदार्थ ‘धिक्कार मोर्चा’

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) तर्फे आज दिनांक २७ मार्च २०१५ रोजी दुपारी १२ वाजता लोहगाव येथील डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयावर अभाविपच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेदार्थ ‘धिक्कार मोर्चा’ काढण्यात आला. हा मोर्चा लोहगाव बस-स्थानक पासून डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालया पर्यंत काढण्यात आला. या मोर्च्या मध्ये डी.वाय.पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्पुर्त प्रतिसाद नोंदवला. या मोर्चा मध्ये ३५५ विद्यार्थी सहभागी झाले होते. या मोर्चा द्वारे शिक्षणातील बाजारीकरण खपवून न घेण्याचा तसेच ‘इतर फी’ च्या नावाखाली विद्यार्थ्यांची लुट थांबवण्याचा निर्धार अभाविपने व्यक्त केला. या मोर्चाद्वारे अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील भ्रष्ट कारभाराबदल आपला रोष व्यक्त केला.विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबद्दल गांभीर्य नसलेल्या महाविद्यालय प्रशासनाकडून निवेदन स्वीकारण्याची तसदीही दाखवण्यात आली नाही.
सदर मोर्चाची पार्श्वभूमी अशी आहे की अभाविप तर्फे दिनांक २४ मार्च २०१५ रोजी डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, लोहगाव येथे अतिरिक्त स्टेशनरी शुल्क आकारल्या विरोधात आंदोलन करण्यासाठी अभाविपचे १५ कार्यकर्ते महाविद्यालयाच्या मुख्य द्वारासमोर पोहोचले होते. महाविद्यालयने बोलावलेल्या गुंड व कर्मचाऱ्याकडून अभाविपच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली होती. त्यामध्ये ३ कार्यकर्ते गंभीर रित्या जखमी झाले होते. या मध्ये महाविद्यालायचे जनसंपर्क अधिकारी अनिल जाहीर व त्यांचे सुरक्षा रक्षक, CAO प्रवीण पाटील, प्राचार्य सोनावणे, प्राचार्य कळवणे, कार्यालय स्टाफ राज घाडगे व सहयोगी, सुरक्षा प्रमुख अजय लाल व महाविद्यालय सुरक्षारक्षक सहभागी होते. कार्यकर्त्यांना मारहाण होत असताना आंदोलनामध्ये सहभाग घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना जबरदस्तीने वर्गात कोंडून ठेवले होते. या वेळी उपस्थित पोलिस अधिकारी आनंद शहाणे यांनी बघ्याची भूमिका घेतली होती. मारहाणीचे चित्रीकरण करत असतानाचा कार्यकर्त्याचा मोबाईल हिसकवून घेण्यात आला होता. महाविद्यालायला अभाविपच्या आंदोलनाची पूर्वसूचना असताना महाविद्यालायने अश्या प्रकारचे कृत्य करून लोकशाहीला काळीमा फासण्याचे कृत्य केले होते.
डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेच्या लोहगाव येथील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिक्षण शुल्क समितीने निर्धारित केलेल्या शुल्काव्यतिरिक्त स्टेशनरी फी च्या नावाखाली अभियांत्रिकी महविद्यालयात ७००० रुपये घेतले जात आहेत. या स्टेशनरी साहित्याचे बाजारमूल्य फक्त ४०० रुपये च्या दरम्यान आहे. याप्रकारे महाविद्यालयांमध्ये स्टेशनरी फी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांची कोट्यावधी रुपयांची लुट होत आहे. शिक्षण शुल्क समितीच्या नियमांना डावलून महाविद्यालये अतिरिक्त शुल्क अनिवार्य करत आहे. अशा प्रकारे बेकायदेशीर फी घेऊन महाविद्यालय शिक्षणाच्या मूळ तत्त्वालाच गेल्या ४ वर्षापासून काळीमा फासत आहे.
महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारे जी बेकायदेशीर फी विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात आली आहे ती विद्यार्थ्यांना तत्काळ परत मिळावी व महाविद्यालय प्रशासनाने कार्यकर्त्यांची जाहीर माफी मागावी अन्यथा महाराष्ट्र भर तीव्र आंदोलनाची मालिका उभी करण्याचा व जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत विविध स्तरावर संघर्ष चालू ठेवण्याचा ईशारा अभाविपचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री श्री. विवेकानंद उजळंबकर यांनी या मोर्चा द्वारे दिला.

Sunday, January 4, 2015

Prant Patrak

आपण सर्वजण युवक सप्ताह जिल्हा मेळाव्याच्या तयारीमध्ये व्यस्त असाल. राष्ट्रीय अधिवेशनामध्ये झालेल्या निर्णयानुसार युवकसप्ताह च्या कार्यक्रमामध्ये व्यसनमुक्त - पर्यावरणयुक्त -
स्वच्छ भारत अभियान सर्वत्र चालवणार आहोत. या काळात महाविद्यालय परिसर, शहरातील वस्तीवर
व्यसनमुक्त - पर्यावरणयुक्त - स्वच्छ भारत या विषयावर विविध कार्यक्रम अपेक्षित आहेत
~ भाषण - व्यसनाधिनतेवर भयावह वर्तमान स्थिती, पर्यावरणपूरक जीवन, स्वच्छ भारत इ . प्रभोधन करणारे भाषणे.

~ चर्चासत्र - व्यसनाधीनतेबद्दल, पर्यावरणाबद्दल ची मते मांडण्यासाठी खुल्या चर्चासत्राचे आयोजन करावे
~ पथनाट्य -अधिकाधिक समाजापर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे पथनाट्य. वरील ३ विषयला किंवा १ विषयाला घेऊन पथनाट्य. यावर पथनाट्य स्पर्धा होऊ शकते
~ प्रदर्शनी- निवडक अभ्यासपूर्ण प्रदर्शनी च्या माध्यमातून जनजागरण
~ लघुपट(shortfilm)- विद्यार्थ्याच्या द्वारे किंवा अन्य व्यावसायिकाद्वारे निर्मिलेल्या या विषयावरील लघुपट प्रदर्शित करणे किंवा स्पर्धा घेणे
~ विविध स्पर्धा - निबंध , ppt , वकृत्व,वादविवाद , छायाचित्र(मोबाईल) इ स्पर्धाचे आयोजन करू शकतो
सर्व विद्यार्थ्याकडून व्यसनमुक्त - पर्यावरणयुक्त - स्वच्छ भारतबद्दल आपल्या कर्तव्यपूर्तीचा संकल्प लिहून घेणे किंवा शपथ देणे
अधिकाधिक विद्यार्थ्याचा सहभाग वाढण्यासाठी अजून बरेच कार्यक्रम , उपक्रम यानिमित्ताने करता येतील आपल्या सूचना , पोस्टर, लघुपट (shortfilm ) चे या अभियानात स्वागत आहे


Devdatta Joshi
State. Org. Secretary ,ABVP Maha

Friday, January 2, 2015


Tuesday, October 28, 2014

Work of ABVP

विद्यार्थी परिषदेच्या कामातील एक तंत्र म्हणजे कार्यकर्त्याशी होणा-या सहज गप्पा किंवा भेटी. या गप्पांचं शास्त्र कार्यकर्त्यांनी स्वतःच्या अनुभवावर विकसित केलं आहे. त्याला एक निश्चित असा दृष्टिकोन, वैचारिक अर्थ आणि प्रगल्भतेची खोली आहे. खरं तर आजच्या व्यवस्थापन भाषेत बोलायचं झालं तर 360 Degree Feedback असंही म्हणता येईल. मुळातच शिकवण्यापेक्षा सातत्याने शिकत रहाणं हीच भावना या गप्पांमधून विकसित होत रहाते. कार्यकर्ता व्यवहार असाच ऐकण्याचा, विश्वासाचा, पारदर्शीपणाचा, संवेदनशीलतेचा आणि मोकळेपणाने वावरण्याचा संस्कार जपत प्रेरणेचं प्रतिबिंब आहे. गप्पा किंवा भेटीतून मार्गदर्शन करीत असताना सहजतेने एकमेंका विषयीची आत्मीयता, आधार आणि विचार खूप काही शिकवून जातो. याचमुळे गेल्या अनेक वर्षाचा अनुभव म्हणून परिषदेचं काळाच्या आणि आधुनिक व्यवस्थापन कसोटीवर घासून पहाता येण्यासारखे असं संवादशास्र विकसित झालं आहे.

विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्ते नेहमी बोलताना म्हणतात आपलं काम माणसांचं काम आहे. याचा अर्थ खरा माणसं एकमेंकांना जोडण्याशी अधिक आहे. आपापसातील संवाद, प्रतिसाद आणि माहिती पुरविण्याची ताकद अगदी शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहचवणं हे विद्यार्थी परिषदेच्या कार्यपद्धतीतील उत्तम व्यवस्थापनाचं माॅडेल आहे. संघटना आणि संस्थाचं यश हे खरं तर कार्यपद्धतीत आहे. कार्यकर्त्यांचा कार्यपद्धतीविषयी असलेली श्रद्धा आणि आदर पिढ्यानुपिढ्या जसाच्या तसा राहिला आहे. आज व्यावसायिक जगात अनेक आधुनिक व्यवस्थापनाची साधनं उपलब्ध असताना असा भाव निर्माण करणं किती कठिण आहे याचं मोठं आव्हान आहे. विद्यार्थी परिषदेच्या कामात समन्वय साधत असताना काम करत असेलल्या प्रवाहाची वृद्धी ही सरळसरळ राष्ट्र उभारणीशी जोडली गेली आहे. साद प्रतिसाद व देवाणघेवाणीच्या ह्या जिंकू जिंकू याच रचनेतून कार्यकर्ता विकसित होत जातो.

विद्यार्थी परिषदेच्या कामात प्रवास, संपर्क आणि बैठका या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाच्या आहेत. कार्यरत असण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीसाठी जशी ऊर्जा पुरवावी लागते आणि त्यासाठी इंधन आवश्यक असतं तसंच खरं तर प्रवास, बैठका आणि संपर्क याचं महत्व आहे. प्रारुप नावाची गोष्ट म्हणजे एका अर्थाने तत्वजिज्ञासा जोपसण्याचा एक आगळावेगळा कायमस्वरूपी मनावर कोरला गेलेला संस्कार आहे. राष्ट्रीय पुनर्निर्माण करत असताना अनेक गोष्टींच्या नाविन्यासह पुनर्रचनेसाठी परिपूर्णता आवश्यक ठरते. प्रारुप या परिपूर्णतेसाठी कामात सातत्याने उत्तमाचा ध्यास निर्माण करत रहातं. अजून एका अर्थाने हा सातत्याने चालणारा ज्ञानयज्ञ सुद्धा आहे. याचमुळे "अग्नेय स्वाहा।अग्नेय इदं न मम्" अशी भावना मनात ठेवून देशासाठी तन, मन आणि धन स्वतःच्या समिधेच्या स्वरूपात समर्पण करणारे अनेक कार्यकर्ते काम करत रहातात. शेवटचा ठिपका प्रणवाचा;पूर्णत्व पाहणाऱ्या मानवाचा. याचा सरळ अर्थ अगदी सहजतेनं मी एक आहे मला अनेक बनायचंय असा आहे.

संजय साळवे.

ABVP Supporter's

You are Visitor Number